अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ

अध्यापक बालकाश्रम लालटाकी रोड अहमदनगर

जुन्या जाणत्या सभासदांनी अत्यंत कष्टातून उभारलेले हेच ते विकास मंडळाचे अध्यापक बालकाश्रम
या अध्यापक बालकाश्रमाने अनेक विद्यार्थ्यांना निवासाची सोय करून दिली.त्यामुळेच अनेक गरजू विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ लालटाकीरोड अहमदनगर जिल्हा अहमदनगर या सार्वजनिक ट्रस्टचा कारभार व सुव्यवस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये चालतो.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे गट क्र.१५०/१ ब वर ५१.२४ आर एवढे क्षेत्र अहमदनगर शहराच्या मध्यभागी लालटाकी रोड , या हमरस्त्यावर आहे.या क्षेत्रावरील इमारत व जागेचा अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ या नावाने पब्लिक ट्रस्ट नं. ई-३०५ ,अहमनगर दि.१३-९-१९८५ अन्वये ट्रस्ट डिड करण्यात आला आहे.
अहमनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व कटक मंडळाचे शिक्षक या ट्रस्टचे सभासद आहेत.
१) अध्यापक बालकाश्रम
तत्कालिन काळात नगरसारख्या शहरवस्तीच्या ठिकाणी शिक्षणाकरिता राहणे सर्वसामान्यांना परवडत नसायचे. त्या परिस्थितीमध्ये या वसतिगृहाचा अनेक विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत मोलाचा वाटा राहिलेला आहे.परंतु आता वसतीगृहाची वास्तु जीर्ण आणि मोडकळीस आलेमुळे स्ट्रक्चरल आॉडिट रिपोर्ट व महापालिकेच्या जा.क्र./सा.बां.वि./२१३५ दि.१६/१/२०१७ च्या आदेशाने व दि.२७/७/२०१७ च्या विश्वस्त मंडळ बैठकीमधील निर्णयानुसार पाडण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली आणि नवीन सुसज्ज वास्तुचा आराखडा तयार करून संमत केला गेला.
२)गुरूकुल इमारत: विश्वस्त मंडळावर सभासदांनी विश्वास दाखवून १००० रू ठेवीमधून गुरूकुल हि २२ गाळे,१० कार्यालये व १ महाराष्ट्र बँकेचे विभागीय कार्यालय असलेली *गुरूकुल नावाची* वास्तु शहराच्या लालटाकी भागात उभी आहे.
३)अहमदनगर शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी विकास मंडळाच्या जागेवर शहरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे भव्य व्यावसायिक तसेच सामाजिक उपक्रमांना वाव देणारे शिक्षकांचे भव्य दिव्य संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

संस्थेला प्राप्त झालेले आयकर विभागाचे १२अ प्रमाणपत्र